Loksabha election 2024: भाजप लवकरच लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी करणार जाहीर, 6 वाजता होणार पत्रकार परिषद

पहिल्या यादीत वाराणसी, अयोध्या, प्रयागराज, आझमगड आणि गोरखपूरसह उत्तर प्रदेशातील अनेक प्रमुख जागांसाठी उमेदवारांची नावे असतील, असे सांगण्यात येत आहे.

BJP | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

भाजप आज संध्याकाळी ६ वाजता दिल्लीतील मुख्य कार्यालयात महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. भाजप लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव उमेदवारांच्या पहिल्या यादीत असण्याची शक्यता आहे. याशिवाय गृहमंत्री अमित शहा यांचेही नाव या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या यादीत वाराणसी, अयोध्या, प्रयागराज, आझमगड आणि गोरखपूरसह उत्तर प्रदेशातील अनेक प्रमुख जागांसाठी उमेदवारांची नावे असतील, असे सांगण्यात येत आहे.

उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी 29 फेब्रुवारी रोजी दिल्ली भाजप मुख्यालयात पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. ही बैठक रात्री 8 वाजता सुरू झाली आणि पहाटे 4 वाजेपर्यंत चालली, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह प्रमुख भारतीय नेते सहभागी झाले होते.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)