Bhubaneswar-Howrah Jan Shatabdi Express: भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेसला कटक स्थानकावर, धोका टळला, कोणतीही जीवित हानी नाही (Watch Video)
ट्रेन भुवनेश्वरहून पश्चिम बंगालच्या हावडा येथे जात असताना डब्याखाली आग लागल्याचे काही प्रवाशांना दिसले. त्यांनी संबंधित विभागांना कल्पना देताच काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान सेवेत दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यात आली.
भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेस (12074) मध्ये आज (गुरुवार, 7 डिसेंबर) सकाळी कटक स्थानकावर आग लागली. ही ट्रेन भुवनेश्वरहून पश्चिम बंगालच्या हावडा येथे जात असताना डब्याखाली आग लागल्याचे काही प्रवाशांना दिसले. त्यांनी संबंधित विभागांना कल्पना देताच काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान सेवेत दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाल्याची कोणतेही वृत्त नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कटक स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर थांबताना ब्रेक बाइंडिंगमध्ये झालेल्या समस्येमुळे ही आग लागली. सुदैवाने, ट्रेन स्थानकावर थांबली असताना आग भडकली, त्यामुळे अग्निशमन दल आणि आरपीएफच्या जवानांनी तात्काळ आपत्कालीन परिस्थिती हाताळून ती आटोक्यात आणली. रेल्वे अभियंते आणि अग्निसुरक्षा पथकाकडून कसून तपासणी आणि परवानगी घेतल्यानंतर ट्रेनने कटक स्थानकाहून आपल्या गंतव्यस्थानासाठी सोडले. (हेही वाचा, Fire In Local Train: गुजरातमधील बोताड रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनला आग; Watch Video)
व्हिडिओ
#WATCH | Odisha | An incident of fire was reported on Bhubaneswar-Howrah Jan Shatabdi Express at Cuttack station today morning. The fire was brought under control by fire services personnel. The cause of the fire is yet to be ascertained.
After the fire was brought under… pic.twitter.com/KZYyU3dvpd
— ANI (@ANI) December 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2023 08:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

