Bharatanatyam Guru Sri Ganeshan passes Away: भरतनाट्यम गुरु गणेशन यांचा सांस्कृतिक सोहळ्यात स्टेज वर कोसळून मृत्यू

भुवनेश्वर मध्ये 3 दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याची सांगता शुक्रवारी होत असताना श्री गणेशन यांचा मृत्यू झाला आहे.

Sri Ganeshan । Twitter

भरतनाट्यम गुरु गणेशन यांचा ओडिशा मध्ये एका  सांस्कृतिक सोहळ्यात स्टेज वर कोसळून मृत्यू  झाल्याची माहिती समोर आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार प्रसिद्ध मलेशियन भरतनाट्यम गुरु गणेशन दीप प्रज्वलनासाठी स्टेज वर आले. पण काही क्षणात ते स्टेजवर कोसळले. त्यांना तातडीने नजिकच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले परंतू  त्यांना उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत जाहीर केले. गणेशन हे मलेशिया भरतनाट्यम डान्स असोसिएशनचे अध्यक्ष तसेच क्वालालंपूर येथील श्री गणेशालयाचे संचालक होते.

पाहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement