Bengaluru Shocker: विजेच्या तारेवर पाय पडून आईसह 9 महिन्यांचा मुलीचा मृत्यू; BESCOM विरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल, तपास सुरु

खासदार सूर्या यांनी, या घटनेबाबत जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. तसेच मृतांच्या कुटुंबाला लवकरात लवकर पुरेशी भरपाई दिली जावी असेही ते म्हणाले.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

बेंगळुरूच्या व्हाईटफील्डच्या होप फार्म येथे रविवारी पहाटे रस्त्यावर पडलेल्या एका वायरवर पाय पडल्याने, 23 वर्षीय महिला आणि तिच्या नऊ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 6 वाजता घडली. महिला सौंदर्या आपल्या लहान मुलीसह तामिळनाडूहून घरी परतत होती त्यावेळी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच काडूगोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आणि दोघींनाही तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र दोघांची दुर्दैवी अंत झाला. याबाबत बेंगळुरू वीज पुरवठा कंपनी (BESCOM) अधिकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार सूर्या यांनी, या घटनेबाबत जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. तसेच मृतांच्या कुटुंबाला लवकरात लवकर पुरेशी भरपाई दिली जावी असेही ते म्हणाले. (हेही वाचा: Firecracker In Hen’s Private Part: कोंबडीच्या गुप्तांगात फटाका फोडला, आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील क्रुर घटना)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement