Bengaluru Shocker: पालकांनी फोन काढून घेतल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाने केली आत्महत्या; राहत्या घरी घेतला गळफास

मुलाने जेव्हा गळफास घेतला तेव्हा त्याची बहीण हॉलमध्ये टीव्ही पाहत होती. मुलाने गळफास घेतला मात्र त्यानंतर दोरी तुटली व तो खाली पडला. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

बेंगळुरू येथे पालकांनी मोबाईल काढून घेतला म्हणून 13 वर्षीय हायस्कूलच्या विद्यार्थ्याने मंगळवारी रात्री त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलाचा मोबाइल काढून घेतल्याने तो नाराज झाल्याचे पालकांनी सांगितले. मुलाची आई कपड्यांच्या कारखान्यातून घरी परतली तेव्हा, तिला मुलाने गळफास लावल्याचे दिसले. त्यावेळी मुलगा फरशीवर बेशुद्ध होऊन पडला होता व त्याच्या गळ्यात तुटलेली दोरी होती. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने तिने त्याला जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाचे वडील बेकरीमध्ये काम करतात. मुलाने जेव्हा गळफास घेतला तेव्हा त्याची बहीण हॉलमध्ये टीव्ही पाहत होती. मुलाने गळफास घेतला मात्र त्यानंतर दोरी तुटली व तो खाली पडला. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. एका तपास अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. माहितीनुसार, मुलगा सतत फोन वापरत असल्याने त्याच्या पालकांनी दोन दिवसांपूर्वी त्याच्याकडून फोन काढून घेतला होता. याच रागातून मुलाने आत्महत्या केल्याचा संशय आहे. (हेही वाचा: Andhra Pradesh Crime: विम्याचे पैसे मिळण्यासाठी बहिणीची हत्या; आंध्र प्रदेशमधून रिअल इस्टेट एजंटला अटक)

पालकांनी फोन काढून घेतल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाने केली आत्महत्या-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now