Bengaluru Road Rage Video: बेंगलूरू मध्ये 4 तरूणांनी दिवसाढवळ्या कार चालकासोबत बेशिस्त वर्तन करत केलं गाडीचं नुकसान; सारा प्रकार कॅमेर्यात कैद (Watch Video)
कार चालकाने डॅशबोर्डवरून घडलेला सारा प्रकार रेकॉर्ड केला आहे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडीयात चांगलाच वायरलही झाला आहे.
Bengaluru मध्ये Road Rage चा एक प्रकार समोर आला आहे. यामध्ये काही बाईकस्वारांनी रस्त्यात बेशिस्तपणे गाडी चालवण्यासोबतच कारची तोडफोड केल्याची, चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची दखल बेंगलूरू पोलिसांनी देखील घेतली आहे. दरम्यान एफआयआर दाखल करत त्यांनी असा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नसल्याचं ट्वीट करत म्हटलं आहे. कार चालकाने डॅशबॉर्डवरून कॅमेर्यात सारा प्रकार कैद केला आहे. या व्हीडिओमध्ये मुद्दामून वाकड्या तिकड्या बाईक चालवणार्यांना कार चालकाने हॉन्क करून अलर्ट केले होते पण उलट त्या बाईकस्वारांनी कार चालकासोबतच गैरवर्तन केले.
पहा बेंगलूरू मधील हा road rage चा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)