Bengaluru: वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून बिबट्या जेरबंद, व्हिडिओ व्हायरल

त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून त्याला जेरबंद केले आणि नैसर्गिक अधिवासात सुरक्षीतपणे नेऊन सोडले. सिंगासंद्रा येथील एका अपार्टमेंटच्या पार्किंग एरियात बिबट्या वावरत असतानाचे एक सीसीटीव्ही फुटेज रविवारी समोर आले. त्यानंतर वनविभागाने बिबट्याचा माग काढण्यासाठी एक पथक पाठवले.

Leopards | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सिंगासंद्र परिसरातील कुडलू गेटजवळ बिबट्याचा वावर आढळून आला. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून त्याला जेरबंद केले आणि नैसर्गिक अधिवासात सुरक्षीतपणे नेऊन सोडले. सिंगासंद्रा येथील एका अपार्टमेंटच्या पार्किंग एरियात बिबट्या वावरत असतानाचे एक सीसीटीव्ही फुटेज रविवारी समोर आले. त्यानंतर वनविभागाने बिबट्याचा माग काढण्यासाठी एक पथक पाठवले. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, भटक्या प्राण्याला पकडण्यासाठी 30 कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत होते आणि त्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)