Baramati Assembly Bypoll: बारामती विधानसभा पोटनिवडणूक, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या मुलांसह हनुमान मंदिरात दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले.

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीपूर्वी त्यांनी सकाळी बारामती येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे दोन्ही पुत्र, पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते.

अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आता सुनेत्रा पवार महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी देवदर्शन करून त्यांनी प्रचाराच्या पुढील टप्प्याला सुरुवात केली आहे. सकाळी सुनेत्रा पवार यांनी हनुमान मंदिरात विशेष पूजा आणि आरती केली. यावेळी पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या मातोश्रींना पूर्ण पाठबळ दर्शवले. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, बारामतीचा विकास आणि प्रलंबित कामे पूर्ण करणे हेच त्यांचे मुख्य ध्येय आहे. त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत मतदारांचे आशीर्वाद मागितले.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement