Banks to Remain Open on 31st March: सार्वजनिक सुट्टी असूनही 31 मार्च 2025 रोजी सर्व बँका व्यवहारांसाठी खुल्या; RBI ची माहिती

करदात्यांना अधिक सुविधा देण्यासाठी, सरकारी कामकाज करणाऱ्या एजन्सी बँकांच्या शाखा 31 मार्च 2025 (सोमवार-सार्वजनिक सुट्टी) रोजी व्यवहारांसाठी खुल्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

RBI (Photo Credits: PTI)

करदात्यांना सुविधा देण्यासाठी, 31 मार्च 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी असूनही, सर्व बँका व्यवहारांसाठी खुल्या राहणार आहेत. आरबीआयने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, करदात्यांना अधिक सुविधा देण्यासाठी, सरकारी कामकाज करणाऱ्या एजन्सी बँकांच्या शाखा 31 मार्च 2025 (सोमवार-सार्वजनिक सुट्टी) रोजी व्यवहारांसाठी खुल्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारी पावत्या आणि देयकांचा हिशेब सुलभ करण्यासाठी, देशभरात विशेष क्लिअरिंग ऑपरेशन्स करण्यासाठी आवश्यक व्यवस्था देखील करण्यात आली आहे. 31 मार्च 2025 रोजी सरकारी धनादेशांसाठी विशेष क्लिअरिंग केले जाईल, ज्यासाठी पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स विभाग (DPSS), आरबीआय आवश्यक सूचना जारी करेल. करदात्यांना त्यांच्या कर देय रकमेबाबत त्यांचे व्यवहार आधीच पूर्ण करण्याचे आवाहन केले जाते. एजन्सी बँकांना वार्षिक समाप्तीसाठी सूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: Today Gold Price: सोन्याच्या दराने गाठली नवी पातळी! 10 ग्रॅम सोन्याची किंमत 91,000; जाणून घ्या आजचा भाव)

Banks to Remain Open on 31st March:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement