Ayodhya Deepotsav 2022: अयोध्येच्या दीपोत्सवात 15 लाख दिवे प्रज्वलित; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद (See Photos and Videos)
सरयू घाटावर दिव्यांच्या माध्यमातून राम मंदिराचा आकार साकारला गेला, जो इतका भव्य आणि दिव्य दिसत होता की सर्वांच्या नजरा त्यावरच खिळल्या होत्या.
रविवारी अयोध्येत मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 15 लाख दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. एकाच वेळी पंधरा लाख 76 हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले, त्यामुळे या घटनेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. सरयू घाटावर दिव्यांच्या माध्यमातून राम मंदिराचा आकार साकारला गेला, जो इतका भव्य आणि दिव्य दिसत होता की सर्वांच्या नजरा त्यावरच खिळल्या होत्या. याशिवाय राम की पौड़ीवरील 15 लाख दिव्यांच्या प्रकाशाने या तेजात भर पडली. अशाप्रकारे अयोध्येतील हा सहावा दीपोत्सव कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)