Auto Spotted On Atal Setu: शिवडी ते न्हावा शेवा सागरी सेतूवर रिक्षांचा वावर? फोटो व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच उद्घाटन झालेला शिवडी ते न्हावा शेवा सागरी सेतू नागरिकांसाठी खुला झाला आहे. अटल सेतू म्हणून या मार्गाला नाव दिले गेले आहे. दरम्यान, या सेतूवर वाहन रोखून थांबण्यास तसेच दुचाकी आणि तिनचाकी वाहनांना परवानगी नाही. असे असले तरी या मार्गावरुन एका रिक्षाचालकाने रिक्षा चालवल्याचा दावा केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच उद्घाटन झालेला शिवडी ते न्हावा शेवा सागरी सेतू नागरिकांसाठी खुला झाला आहे. अटल सेतू म्हणून या मार्गाला नाव दिले गेले आहे. दरम्यान, या सेतूवर वाहन रोखून थांबण्यास तसेच दुचाकी आणि तिनचाकी वाहनांना परवानगी नाही. असे असले तरी या मार्गावरुन एका रिक्षाचालकाने रिक्षा चालवल्याचा दावा केला जात आहे. @saravnan_rd या एक्स हँडलवरुन या ऑटोरिक्षाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे खरोखरच ऑटोरिक्षा या मार्गावर येऊ लागल्या आहेत का? याबातब प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

एक्स पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement