ATF Price Hike: सणासुदीच्या काळात विमान प्रवास महागण्याची शक्यता; एटीएफच्या किमतीत 14 टक्क्यांनी वाढ
सलग तिसऱ्या महिन्यात तेल कंपन्यांनी जेट इंधनाच्या किमती वाढवल्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी एव्हिएशन टर्बाइन फ्युएल किंवा जेट इंधनाच्या किमतीत 8.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.
एव्हीएशन फ्युएल किंवा एटीएफच्या किमतीत शुक्रवार म्हणजेच 1 सप्टेंबरपासून 14 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. अशाप्रकारे विमान इंधनाच्या किमतीत सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने जेट इंधन महाग झाले आहे. याआधी 1 ऑगस्ट आणि 1 जुलै रोजीही दरात वाढ करण्यात आली होती. डिसेंबर 2022 नंतर एटीएफच्या किंमती उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात विमान तिकिटांच्या किमतीही वाढू शकतात.
दुसरीकडे, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सारख्या आस्थापनांमध्ये वापरल्या जाणार्या व्यावसायिक एलपीजीच्या किंमतीत प्रति सिलिंडर 157.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 1,522.50 रुपये आहे. सलग तिसऱ्या महिन्यात तेल कंपन्यांनी जेट इंधनाच्या किमती वाढवल्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी एव्हिएशन टर्बाइन फ्युएल किंवा जेट इंधनाच्या किमतीत 8.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. वेगवेगळ्या राज्यांमधील स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित कर (व्हॅट) यावरून त्या बदलतात. (हेही वाचा: Google Flights वापरुन स्वस्तात मिळवा फ्लाईट तिकीट, घ्या जाणून)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)