Assam Boat Tragedy: 120 प्रवासी घेऊन जाणाऱ्या दोन बोटी ब्रह्मपुत्रा नदीत एकमेकांना धडकल्या; 70 लोक बेपत्ता, एकाचा मृत्यू
येथे 120 प्रवासी घेऊन जाणाऱ्या दोन बोटी ब्रह्मपुत्रा नदीत एकमेकांना धडकल्या आहेत
आसामच्या जोरहाटमध्ये बुधवारी संध्याकाळी मोठा अपघात झाला आहे. येथे 120 प्रवासी घेऊन जाणाऱ्या दोन बोटी ब्रह्मपुत्रा नदीत एकमेकांना धडकल्या आहेत. अपघातानंतर सुमारे 70 लोक बेपत्ता आहेत, ज्यांचा शोध सुरू आहे. 50 लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे.
दोन्ही बोटी वेगवेगळ्या दिशांनी येत होत्या. एक बोट जोरहाटमधील निमटीघाटहून माजुलीकडे जात होती, तर दुसरी माजुलीहून जोरहाटकडे जात होती. बोटींमध्ये 25-30 बाईकही ठेवण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या टीमकडून बचाव मोहीम चालू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही या भीषण बोट दुर्घटनेबद्दल दु: ख व्यक्त केले आहे.
दोन बोटी ब्रह्मपुत्रा नदीत एकमेकांना धडकल्या-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)