Assam and Meghalaya Earthquake: आसाम आणि मेघालयात 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; बांगलादेश, भूतानमध्येही जाणवले धक्के

बांगलादेश, भारत आणि भूतान या तीनही देशातील अनेक भागात या भूकंपाचे धक्के जाणवले.

Earthquake

Assam  Earthquake: आज म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मध्य आसाममध्ये 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. बांगलादेश, भारत आणि भूतान या तीनही देशातील अनेक भागात या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र मेघालयपासून 3 किमी अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी 17 जानेवारी रोजी मध्य आसाममध्ये 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्याआधी मध्य आसाम, विशेषत: कार्बी आंगलाँग आणि दिमा हसाओ जिल्ह्यांच्या प्रदेशात 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. आजही राज्यातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now