Tulip Garden: श्रीनगरमधील जगप्रसिद्ध ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खूले (Watch Video)
जम्मू-काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी हे विशेष आकर्षण आहे.
आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले झाले आहे. शनिवारपासून म्हणजेच 23 मार्चपासून हे उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. उद्यानाचे उद्घाटन झाल्यानंतर पर्यटक मोठ्या संख्येने येथे पोहोचले. यावेळी सर्वात खास बाब म्हणजे यावेळी बागेत 68 प्रकारची 17 लाख ट्युलिप फुले आली आहेत. एवढेच नाही तर यंदा पाच नवीन वाणांचाही समावेश करण्यात आला आहे. जे दिसायला खूपच सुंदर आहे. 5 हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या बागेत विक्रमी 17 लाख ट्यूलिप फुलांची लागवड करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी हे विशेष आकर्षण आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)