Aryan Khan Drugs Case: एनसीबी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे दिल्लीत; भ्रष्टाचाराबाबत होत आहे चौकशी?

वानखेडे दिल्लीला पोहोचले आहेत, यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, 'मला बोलावले गेले नाही. मी इथे एका वेगळ्या हेतूने आलो आहे. माझ्यावरील आरोप खोटे आहेत.'

Sameer Wankhede | (Photo Credits: ANI)

एनसीबी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे दिल्लीला पोहोचले आहेत. सध्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्या ड्रग्ज प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर आहे. सकाळी माहिती मिली होती की, एनसीबी मुख्यालयाने भ्रष्टाचार प्रकरणी समीर वानखेडेविरुद्ध दक्षता चौकशी सुरू केली आहे. याची चौकशी मुख्य दक्षता अधिकारी स्वत: करत आहेत. तसेच समीर वानखेडे यांना दिल्लीतील एनसीबी मुख्यालयात बोलावले आहे. आता वानखेडे दिल्लीला पोहोचले आहेत, यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, 'मला बोलावले गेले नाही. मी इथे एका वेगळ्या हेतूने आलो आहे. माझ्यावरील आरोप खोटे आहेत.'

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement