Anti-Hijab Law Protests: इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनाला भारताचा पाठिंबा; केरळमधील महिलांनी जाळले हिजाब (Watch)

कोझिकोडमधील या आंदोलनाला अधिक महत्त्व आहे कारण या भागात मुस्लिम समाजाचे वर्चस्व आहे.

Anti-Hijab Law Protests

इराणमधील हिजाबविरोधी निदर्शनाची आग भारतातही पोहोचली आहे. केरळमधील कोझिकोड टाऊन हॉलसमोर मुस्लिम महिलांच्या एका गटाने हिजाब जाळून इराणमधील महिलांना पाठींबा दर्शवला. इराणमधील हिजाबविरोधी चळवळीशी एकजुट दाखवत मुस्लिम महिलांनी हिजाब जाळला. केरळ युक्तवादी संगमने आयोजित केलेल्या चर्चासत्रात ही घटना घडली. भारतातील कोणत्याही संघटनेने हिजाब जाळण्याची ही पहिलीच घटना आहे. संघटनेच्या सहा मुस्लिम महिलांनी हिजाब जाळण्याच्या या कृत्याचे नेतृत्व केले. कोझिकोडमधील या आंदोलनाला अधिक महत्त्व आहे कारण या भागात मुस्लिम समाजाचे वर्चस्व आहे.