Anantnag-Rajouri Parliamentary Seat New Polling Date: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अनंतनाग-राजौरी मधील मतदानाच्या तारखेत बदल; 7 मे ऐवजी 25 मे ला मतदान
नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टी आणि भूस्खलनामुळे अनंतनाग आणि राजौरी यांना जोडणारा मुघल रोड ब्लॉक झाला आहे, त्यामुळे निवडणूक प्रचारावर परिणाम होत असल्याच्या कारणावरून मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अनंतनाग-राजौरी मधील मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. जम्मू कश्मीरच्या या जागेवर 7 मे दिवशी होणारं मतदान आता 25 मे दिवशी होणार आहे. जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स, डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) आणि भाजपने काश्मीर खोऱ्यातील या जागेवर ७ मे रोजी होणारे मतदान पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. या राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला सांगितले होते की, नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टी आणि भूस्खलनामुळे अनंतनाग आणि राजौरी यांना जोडणारा मुघल रोड ब्लॉक झाला आहे, त्यामुळे निवडणूक प्रचारावर परिणाम होत आहे.
अनंतनाग-राजौरी मधील मतदानाच्या तारखेत बदल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)