Air India New Uniforms: एअर इंडियाकडून केबिन, कॉकपिट क्रूसाठी नवीन गणवेश सादर; Manish Malhotra ने केला डिझाइन (Watch Video)
भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा लक्षात घेऊन नवीन गणवेशाची रचना करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
Air India New Uniforms for Cabin and Cockpit Crew: टाटा समूहाचा भाग असलेल्या एअर इंडियाने आज त्यांच्या केबिन आणि कॉकपिट क्रूसाठी डिझाइन केलेल्या नवीन गणवेशाचे अनावरण केले. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याने हे कपडे डिझाइन केले आहे. महिला केबिन क्रूसाठी साड्या डिझाइन केल्या आहेत तर पुरुष बंदगळा सूट घालतील. क्लासिक ब्लॅक सूट कॉकपिट क्रूसाठी डिझाइन केला गेला आहे. नवीन गणवेश पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने सादर केले जातील असे कंपनीचे म्हणणे आहे. याची सुरुवात एअर इंडियाच्या पहिल्या एअरबस A350 ने होईल. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा लक्षात घेऊन नवीन गणवेशाची रचना करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यामध्ये अनेक प्रकारचे रंग आणि डिझाइन समाविष्ट करण्यात आले आहेत. एअर इंडियाच्या केबिन क्रू प्रतिनिधी आणि इन-फ्लाइट सर्व्हिस टीम यांच्याशी सल्लामसलत करून नवीन गणवेशाची रचना करण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)