Ahmedabad: स्कूटर चालवताना तरुणाला आला हृदयविकाराचा झटका; गुजरात पोलिसांनी CPR देऊन वाचवले प्राण (Watch Video)

सीपीआर प्रशिक्षण एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी किती उपयुक्त आहे हे अहमदाबादच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले.

Heart Attack | Representational Image (Photo Credits: Pixabay)

गुजरातमध्ये पोलिसांनी एका स्कूटर चालकाचा जीव वाचवला आहे. स्कूटरवरून जाणाऱ्या तरुणाच्या अचानक छातीत दुखू लागल्याने तो स्कूटर थांबवून बाजूला बसला. यानंतर शेजारी उपस्थित असलेल्या पोलिसांना तरुणाला अस्वस्थ वाटत असल्याचे जाणवले व ते ताबडतोब मदतीसाठी पोहोचले. या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याचे वाहतूक पोलिसांच्या लक्षात आले, त्यानंतर लगेचच पोलिसांनी प्राथमिक उपचार म्हणून सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवले. यानंतर रुग्णवाहिका बोलावून तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत तरुणाला शुद्ध आली होती. गुजरातमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सीपीआर प्रशिक्षण दिले जाते. सीपीआर प्रशिक्षण एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी किती उपयुक्त आहे हे अहमदाबादच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले. (हेही वाचा: Mumbai Road Accident Video: मुंबईत दोन बसची धडक, घटनेत डॉक्टरचा मृत्यू, पाहा व्हिडीओ)