Bilaspur Accident Video: ॲक्टिव्हा स्वाराला भरधाव दुचाकीने दिली धडक, व्यक्ती 15 फूट दूर जावून पडली, रुग्णालयात मृत्यू
या धडकेनंतर ॲक्टिव्हा चालक सुमारे 15 फूट अंतरावर पडला असल्याचे सांगण्यात येत आहे. ॲक्टिव्हा स्वार जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले. जिथे त्याचा मृत्यू झाला.
छत्तीसगडमधील बिलासपूर येथून एक भीषण रस्ता अपघात समोर आला आहे. यामध्ये ॲक्टिव्हा चालवणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला यू-टर्न घेत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी चालकाने धडक दिली. या अपघातात ॲक्टिव्हा चालकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघाताचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती ॲक्टिव्हावर बसून रस्त्यावरून यू-टर्न घेण्याचा प्रयत्न करत आहे, यादरम्यान एक भरधाव दुचाकी येऊन ॲक्टिव्हाला धडकते. या धडकेनंतर ॲक्टिव्हा चालक सुमारे 15 फूट अंतरावर पडला असल्याचे सांगण्यात येत आहे. ॲक्टिव्हा स्वार जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले. जिथे त्याचा मृत्यू झाला.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)