Abdu Rozik Calls Off Wedding to Amira: अब्दु रोजिकने मोडले अमीरासोबतचे लग्न; पाच महिन्यांपूर्वी झाला होता साखरपुडा, सांस्कृतिक मतभेदांमुळे घेतला निर्णय

पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिलमध्ये अब्दूने त्याच्या लग्नाची घोषणा केली होती. 20 वर्षांचा अब्दू 7 जुलै रोजी 19 वर्षांच्या अमीरातीशी विवाह करणार होता.

Abdu Rozik

Abdu Rozik Calls Off Wedding to Amira: बिग बॉस 16 फेम अब्दू रोजिकशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. अब्दूने साखरपुड्यानंतर 4 महिन्यांनंतरच आपले लग्न मोडले आहे. पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिलमध्ये अब्दूने त्याच्या लग्नाची घोषणा केली होती. 20 वर्षांचा अब्दू 7 जुलै रोजी 19 वर्षांच्या अमीरातीशी विवाह करणार होता. पण आता त्याने आपले लग्न रद्द झाल्याचे सांगितले. अब्दु रोजिक हा इंटरनेट सेन्सेशन आणि कझाकिस्तानचा प्रसिद्ध गायक आहे. या वर्षी एप्रिलमध्ये अब्दूने सोशल मीडियावर एंगेजमेंट रिंग दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला होता आणि तो अमीरासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले होते. पण आता इंडिया फोरमला दिलेल्या मुलाखतीत अब्दूने हे लग्न रद्द केल्याचे सांगितले. त्यामागचे कारण म्हणजे दोघांमधील सांस्कृतिक फरक, असल्याचे त्याने नमूद केले. अब्दू म्हणाला, मी माझे लग्न रद्द केल्याचे जाहीर करताना मला खूप वाईट वाटत आहे. सांस्कृतिक फरकामुळे मी हा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: Siddharth and Aditi Rao Hydari Tie the Knot: अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थने केले लग्न, अभिनेत्रीने शेअर केले लग्न सोहळ्याचे फोटो)

अब्दु रोजिकने मोडले अमीरासोबतचे लग्न-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now