Aadhaar Is Most Trusted Digital ID in World: 'आधार हा जगातील सर्वात विश्वसनीय डिजिटल आयडी'; Ministry of Electronics & IT ने फेटाळले Moody’s चे दावे

गेल्या दशकभरात, एक अब्जाहून अधिक भारतीयांनी 100 अब्जाहून अधिक वेळा स्वत:चे प्रमाणीकरण करून आधारवर विश्वास व्यक्त केला आहे.

Aadhaar Card (Photo Credits: PTI)

जगातील प्रसिद्ध रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने भारताच्या आधार प्रणालीच्या सुरक्षा आणि गोपनीयतेच्या असुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आधार ही भारतातील एक केंद्रीय ओळख प्रणाली आहे. अनेकदा आधार प्रणाली अंतर्गत सेवांचे पूर्ण लाभ मिळत नाहीत. अनेक वेळा सेवा नाकारल्या जातात. त्याची बायोमेट्रिक प्रणाली भारतातील उष्ण हवामानात विश्वसनीयपणे काम करत नाही, असे मूडीजने म्हटले आहे. याला प्रत्युत्तर देताना आधार हा जगातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल आयडी असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने म्हटले आहे.

मंत्रालयाने सांगितले की, 'मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसची मते निराधार आहेत. एका विशिष्ट गुंतवणूकदार सेवेने (मूडीज), कोणताही पुरावा न देता, जगातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल आयडी आधारच्या विरोधात जोरदार दावे केले आहेत. गेल्या दशकभरात, एक अब्जाहून अधिक भारतीयांनी 100 अब्जाहून अधिक वेळा स्वत:चे प्रमाणीकरण करून आधारवर विश्वास व्यक्त केला आहे. अशा ओळख प्रणालीवरील विश्वासाच्या या अभूतपूर्व मताकडे दुर्लक्ष करणे म्हणजे वापरकर्त्यांना त्यांच्या स्वतःच्या हिताचे काय आहे हे समजत नाही असा अर्थ काढण्यासारखे आहे.' (हेही वाचा: Home Loan: मोदी सरकारचा मोठा निर्णय! घर खरेदी करणाऱ्यांना मिळणार स्वस्तात गृहकर्ज, वाचा सविस्तर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)