HAL Airport in Bengaluru: ए फ्लाय बाय वायर प्रीमियर 1A विमानात तांत्रिक बिघाड, बेंगळुरू येथील एचएएल विमानतळावर आपत्कालीन लँडींग

ही घटना मंगळवारी (12 जून) घडली. हे विमान एचएएल विमानतळावरून बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होते. विमान लँड करतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Hal Airport to Bangalore

ए फ्लाय बाय वायर प्रीमियर 1A विमानाच्या लँडिंग गियरमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामळे या विमानाचे बेंगळुरू येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. ही घटना मंगळवारी (12 जून) घडली. हे विमान एचएएल विमानतळावरून बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होते. विमान लँड करतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की लँडिंग दरम्यान, फ्लाइटने एचएएल विमानतळाच्या धावपट्टीवर पाण्याचा तलाव ओलांडताना अचानक बिघाड झाला आणि ते जवळजवळ खालीच पडले. दरम्यान, विमान धावपट्टीवर उतरवले तेव्हा विमानात दोन पायलट होते आणि एकही प्रवासी नव्हता. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) अधिकृत निवेदनात म्हटले आहे. डीजीसीएने शेअर केलेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरताना दिसत आहे.

ट्विट