Bengaluru Shocker: बांधकामाधीन इमारतीच्या खड्ड्यात पडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू
बेंगळुरू पोलिसांनी इमारतीचा मालक आणि केअरटेकर सुनील यांच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला.
Bengaluru Shocker: बेंगळुरू (Bengaluru) मधील कडुगोडी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत लिफ्ट बसवण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून पाच वर्षांचा मुलगा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बेंगळुरू पोलिसांनी इमारतीचा मालक आणि केअरटेकर सुनील यांच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला. या घटनेने बांधकाम साइटवरील सुरक्षा प्रोटोकॉल आणि अशा धोक्यांपासून लहान मुले आणि पादचाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी कठोर नियमांची आवश्यकता याविषयी चिंता अधोरेखित केली आहे.
बांधकामाधीन इमारतीच्या खड्ड्यात पडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)