Naxalites Killed in Police Encounter at Telangana: तेलंगणातील मुलुगु येथे पोलिसांच्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार
नुकतेच 22 नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमध्ये झालेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.
Naxalites Killed in Police Encounter at Telangana: नक्षलविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवून, पोलिसांनी तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. एतुरुनगरम जंगल परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यासंदर्भात एसपी मुलुगु डॉ शबरिश यांनी माहिती दिली आहे. घटनास्थळावरून दोन एके-47 आणि एक इन्सास रायफल जप्त करण्यात आली आहे. नुकतेच 22 नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमध्ये झालेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. यानंतर आज 7 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
तेलंगणातील मुलुगु येथे पोलिसांच्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)