Gurugram Shocker: हरियाणाच्या गुरुग्राममध्ये स्मशानभूमीची भिंत कोसळून 4 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरु (Watch Video)

सध्या पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Representational Image (File Photo)

हरियाणातील गुरुग्राममध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील अर्जुन नगरमध्ये स्मशानभूमीची भिंत कोसळून एका मुलासह 4 जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मदत पथक घटनास्थळी पोहोचले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या 6 जणांना बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी 4 जणांना मृत घोषित केले, तर दोन जणांवर उपचार सुरू आहेत. सध्या पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या घटनेचा तपास सुरू केला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)