IPL Auction 2025 Live

Uttar Pradesh: उन्नावमध्ये 150 वर्ष जुन्या पुलाचा भाग गंगा नदीत कोसळला; तीन वर्षांपासून वाहतूकीसाठी होता बंद (Watch Video)

उत्तर प्रदेशातील कानपूरजवळील 150 वर्षे जुना पूल आज 26 नोव्हेंबरला पहाटे गंगा नदीत कोसळला आणि संरचनेचा एक भाग पाण्यात पडला.

Photo Credit- X

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील कानपूरजवळ 150 वर्ष जुन्या पुलाचा भाग कोसळल्याची (Bridge Part Collapse) घटना घडली आहे. आज 26 नोव्हेंबरला पहाटे पुलाचा काही भाग गंगा नदीत (Ganga River) कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. कानपूर (Kanpur) आणि उन्नावला जोडणारा हा पूल होता. मिळालेल्या माहितीनुसार, पूल गेल्या तीन वर्षांपूर्वी खराब झाला होता. वाहतूकीसाठी बंदही करण्यात आला होता. आयएएनएसने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्थानिक लोक पुलाच्या काठावर उभे असताना अधिकारी खाली कोसळलेल्या भागाचे मूल्यांकन करताना दिसत आहेत.

पुलाचा भाग गंगा नदीत कोसळला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)