12.82 Trillion UPI Transactions: भारताचे डिजिटल पेमेंट इंटरफेस युपीआयचा नवा विक्रम; डिसेंबरमध्ये झाले 12.82 ट्रिलियन किमतीचे 7.82 अब्ज व्यवहार

या वर्षी ऑक्टोबरमध्ये युपीआय द्वारे पेमेंटने 12 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. नोव्हेंबरमध्ये, यूपीआयद्वारे 11.90 लाख कोटी रुपयांचे तब्बल 730.9 कोटी व्यवहार झाले.

United Payments Interface (Photo Credits: Twitter)

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे झालेले पेमेंट डिसेंबरमध्ये 12.82 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. 2016 मध्ये लाँच झालेल्या या प्लॅटफॉर्मवर डिसेंबरमध्ये व्हॉल्यूमच्या दृष्टीने 782 कोटी व्यवहार झाले. ‘यूपीआयने देशात डिजिटल पेमेंट क्रांती आणण्यात मोठे योगदान दिले आहे. डिसेंबर 2022 मध्ये, युपीआयने 12.82 ट्रिलियनचे 7.82 अब्ज व्यवहार पार केले आहेत.’ असे वित्तीय सेवा विभागाने सोमवारी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

या वर्षी ऑक्टोबरमध्ये युपीआय द्वारे पेमेंटने 12 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. नोव्हेंबरमध्ये, यूपीआयद्वारे 11.90 लाख कोटी रुपयांचे तब्बल 730.9 कोटी व्यवहार झाले. युपीआय ही झटपट रिअल-टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी इंटर-बँक पीअर-टू-पीअर (P2P) व्यवहार सुलभ करते. यामुळे मोबाईलद्वारे सोप्या पद्धतीने व्यवहार होतात. युपीआय व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क लागू नाही.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now