Uttar Pradesh Crime: अंधश्रद्धेमुळे 10 वर्षाच्या मुलाने गमावला आपला जीव, गळा कापून केली हत्या

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक परिसरातून कृष्णा वर्मा यांचा मुलगा विवेक मागच्या आठवड्यापासून बेपत्ता होता.

Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) अंधश्रद्धेमुळे एका 10 वर्षाच्या मुलाने आपला जीव गमावला आहे. उत्तरप्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील (Bahraich District) परसा गावात एका तांत्रिकाच्या (occultist) सल्ल्याने मानवी बलिदानासाठी 10 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक परिसरातून कृष्णा वर्मा यांचा मुलगा विवेक मागच्या आठवड्यापासून बेपत्ता होता. नंतर एका ठिकाणी गळा चिरलेल्या मुलाचा मृतदेह शेतात पुरलेला आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कृष्णा वर्मा यांच्या एका नातेवाईकाला ताब्यात घेतले असून त्यांनी एका तांत्रिकाच्या सांगण्यावरुन हे कृत्य केल्याचे कबुल केले आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif