‘Pilot Baba’ Dies: जुना आखाड्याचे महामंडलेश्वर पायलट बाबांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन; हरिद्वार येथे दिली जाणार समाधी
पायलट बाबांचा जन्म 1938 मध्ये रोहतास जिल्ह्यातील बिशनपुरा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रम सिंह आणि आईचे नाव तपेश्वरी देवी होते. त्यांनी काशी विश्व हिंदू विद्यापीठातून सेंद्रिय रसायनशास्त्रात एमएससी केले. त्यानंतर ते भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून रुजू झाले.
‘Pilot Baba’ Dies: देशातील प्रसिद्ध संतांपैकी एक संत पायलट बाबा यांचे मंगळवारी दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. पायलट बाबा हे जुना आखाड्याचे महामंडलेश्वर होते. पायलट बाबांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना महायोगी कपिल सिंह या नावानेही ओळखले जाते. ते एक प्रसिद्ध भारतीय आध्यात्मिक नेते आणि भारतीय हवाई दलातील माजी विंग कमांडर होते. ते बरेच दिवस आजारी होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना हरिद्वारमध्ये समाधी देण्यात येणार आहे. पायलट बाबांच्या निधनाची माहिती त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून देण्यात आली आहे.
पायलट बाबांनी 1962 च्या भारत-चीन युद्धात भाग घेतला होता, याशिवाय 1965 आणि 1971 च्या युद्धातही भाग घेतला होता. पण नंतर ते निवृत्त झाले. त्यांचे नाव कपिल अद्वैत समनाथ गिरी होते, परंतु भक्तांमध्ये ते पायलट बाबा म्हणून ओळखले जात होते. जुना आखाड्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, विंग कमांडर कपिल सिंग 1974 मध्ये औपचारिक दीक्षा घेतल्यानंतर जुना आखाड्यात सामील झाले होते आणि त्यांनी संन्यास यात्रा सुरू केली होती. जुना आखाड्याचे संरक्षक हरी गिरी यांनी सांगितले की, जुना आखाड्याने 3 दिवसांचा शोक जाहीर केला असून त्यामध्ये देश-विदेशातील सर्व आश्रमांमध्ये शांतीपाठाचे पठण केले जाणार आहे. (हेही वाचा: Actor Shreyas Talpade Reacts to His Death Hoax: 'मी जिवंत आहे'; निधनाच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना श्रेयस तळपदे ने सुनावलं)
पायलट बाबांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)