Vice President Election: एनडीएचे जगदीप धनखर हे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार, जेपी नड्डा यांची घोषणा

भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. याच बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जगदीप धनखर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Jagdeep Dhankhar (Photo Credit - Twitter)

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. नाव जाहीर करताना पक्षाने सांगितले की, जगदीप धनखर हे एनडीए आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. यापूर्वी दिल्लीत पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. याच बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जगदीप धनखर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement