Jagdeep Dhankhar बनले देशाचे १४ वे उपराष्ट्रपती, 725 पैकी 528 मते मिळवून विजयी झाले

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. धनखर यांना 528, तर अल्वा यांना 182 मते मिळाली.

Jagdeep Dhankhar (Photo Credit - Twitter)

देशाला आज नवीन उपराष्ट्रपती मिळाले आहे. एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. धनखर यांना 528, तर अल्वा यांना 182 मते मिळाली. त्याचवेळी 15 मते रद्द करण्यात आली. जगदीप धनखर हे विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे आणि नवीन उपराष्ट्रपती 11 ऑगस्ट रोजी शपथ घेतील. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 780 पैकी 725 खासदारांनी मतदान केले.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now