Hyderabad Shocker : सशस्त्र दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकावर माया-लेकी तुटून पडल्या; घाबरून चोर उलट्या पावली पळाला (Watch Video)
बंदूकीने धमकावले जात असतानाही न घाबरता चोराशी दोन हात करणाऱ्या माया-लेकींचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. पोलिसांनीही त्यांच्या निडरपणाचे कौतूक केले आहे.
Hyderabad Shocker : 'आज की नारी सब पे भारी' असे लोक मस्करीत बोलतात पण अशीच एक सत्य घटना हैद्राबादच्या (Hyderabad ) बेगमपेट इथून समोर आली आहे. चोरीच्या प्रयत्नात एक जण आपल्या घरात बंदूक घेऊन (Armed Robber) घुसल्याचे समजताच आई आणि मुलीने धाडस दाखवत त्याला हाकलून (Failed Robbery Attempt) लावले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनीही घटनास्थळी धाव घेतली. तिथल्या डीसीपी रोहिणी प्रियदर्शिनी यांनी आई-मुलीच्या या धाडसाचे कौतूक केले. या घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल (Viral Video)झाला आहे. (हेही वाचा : Jalgaon Sex Racket : जळगावमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दफाश; ६० तरूणींची सुटका, 10 महिलांसह 5 दलालांना अटक)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)