Monkey Menace in Mathura: उत्तर प्रदेशमध्ये माकडांचा हौदोस; 5 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला (Watch Video)

एका 5 वर्षाच्या चिमुरडीवर माकडांनी हल्ला केला आहे. घटना घडताच स्थानिकांनी मुलाचा जीव वाचवण्यासाठी धाव घेतली.

Monkey Menace in Mathura: उत्तर प्रदेशातील मथुरा येथे माकडांच्या टोळक्याने 5 वर्षांच्या मुलावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही भयानक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्यामध्ये मुलाला माकडांनी घेरले. व्हिडिओमध्ये स्थानिक रहिवासी त्वरीत हस्तक्षेप करत मुलाचा जीव वाचवण्यासाठी धावत असल्याचे दाखवले आहे. मुलाची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली असून तो सुरक्षित आहे. अधिकाऱ्यांनी रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि अशाच घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा:

Khujli Gang in Delhi: खुजली गँगमधील दोन जणांना अटक, दिल्ली पोलिसांनी सापळा रचून केली अटक (Watch Video))

व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)