Fact Check: मोदी सरकार आधार कार्डवर देत आहे 478000 रुपयांचे कर्ज? काय आहे व्हायरल बातमीचे सत्य? जाणून घ्या

व्हायरल मेसेजमध्ये असा दावाही केला जात आहे की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाइन करावा लागणार आहे.

Fact Check (PC - @PIBFactCheck Twitter)

Fact Check: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या व्हायरल होत आहेत. आता सोशल मीडियावर आधार कार्डबाबत एक बातमी व्हायरल झाली आहे. केंद्रातील मोदी सरकार आधार कार्डवर लोकांना 478000 रुपयांचे कर्ज देत असल्याचा दावा व्हायरल झालेल्या बातम्यांमध्ये केला जात आहे. व्हायरल मेसेजमध्ये असा दावाही केला जात आहे की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाइन करावा लागणार आहे. दुसरीकडे पीआयबी फॅक्ट चेकमध्ये या व्हायरल बातमीची सत्यता तपासली असता, ही बातमी खोटी असल्याचे आढळून आले आणि सरकारने अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असे सांगितले आले.