Indian Army: बेपत्ता भारतीय लष्कर जवान जम्मू-काश्मीर पोलिसांना जिवंत सापडला, पुढील वैद्यकिय तपासणी सुरु

भारतीय जवान लष्कर अखेर काश्मीर मध्ये सापडले. पोलीसांची शोध मोहिम संपली आहे.

Missing (PC - File Image)

Indian Army: बेपत्ता भारतीय लष्कराचा जवान जावेद अहमद वानी जम्मू-काश्मीर पोलिसांनी जिवंत सापडला, वैद्यकीय तपासणीसाठी नेला. गेल्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातून बेपत्ता झालेला एक लष्करी जवान सापडला आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.लडाखमध्ये तैनात जावेद अहमद वानी हे शनिवारी त्यांच्या मूळ कुलगाम जिल्ह्यातून सुट्टीवर असताना बेपत्ता झाले."बेपत्ता लष्करी जवानाला कुलगाम पोलिसांनी परत मिळवले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर लवकरच संयुक्त चौकशी सुरू होईल. पुढील तपशील पुढे येतील," असे काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) विजय कुमार यांनी ट्विटमध्ये सांगितले. बेपत्ता झालेले लष्कर जवानाला शोधण्यासाठी पोलीसांनी आणि लष्करांनी शोधमोहिम सुरु केली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement