McDonald's मध्ये टोमॅटोचा वापर बंद, महागाईमुळे चवीवर होणार परिणाम; पहा VIDEO
मॅकडोनाल्ड्सने दर्जेदार उत्पादनांच्या अनुपलब्धतेचे कारण देत देशाच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भागांतील बहुतेक दुकानांमध्ये अन्न तयार करण्यासाठी टोमॅटोचा वापर थांबविला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये टोमॅटो 100 ते 150 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. त्याचा परिणाम सामान्य माणसावरच नाही तर प्रसिद्ध बहुराष्ट्रीय खाद्य साखळी 'मॅकडोनाल्ड'वरही होत आहे. महागाईत टोमॅटोचे वाढते भाव पाहून मॅकडोनाल्डनेही हात वर केले आहेत. मॅकडोनाल्ड्सने दर्जेदार उत्पादनांच्या अनुपलब्धतेचे कारण देत देशाच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भागांतील बहुतेक दुकानांमध्ये अन्न तयार करण्यासाठी टोमॅटोचा वापर थांबविला आहे. दिल्लीतील मॅकडोनाल्डच्या एका ग्राहकाचे म्हणणे आहे की, "मॅकडोनाल्डच्या निर्णयामुळे चवीवर परिणाम होईल पण ते महागाईमुळे होऊ शकते."
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)