Jharkhand Blast: झारखंड येथील पलामू परिसरात भीषण स्फोट, 3 अल्पवयीन मुलांसह 4 जणांचा मृत्यू

झारखंडमधील पलामू येथे भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रविवारी झालेल्या या स्फोटात तीन अल्पवयीन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Jharkhand Blast PC TWITTER

Jharkhand Blast:  झारखंडमधील पलामू येथे भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रविवारी झालेल्या या स्फोटात तीन अल्पवयीन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनाटू पोलीस स्टेशन परिसरात एका भंगार विक्रीच्या ठिकाणी हा स्फोट झाला. हे ठिकाण राज्याची राजधानी रांचीपासून सुमारे 190 किलोमीटर अंतरावर आहे. (हेही वाचा- रॉयल एनफिल्ड बाईकचा भीषण स्फोट, 10 जण जखमी, हैद्राबाद येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, भंगार विक्रीच्या ठिकाणी हा स्फोट झाला. पलामूसह चार जागांवर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली. पलामूचे पोलिस अधीक्षक (एसपी) रिश्मा रामसन यांनी पीटीआयला सांगितले की, "या घटनेत तीन अल्पवयीन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. पोलिस घटनास्थळी दाखल होताच, जखमींना रुग्णालयात दाखल केले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे.

आग कश्याने लागली याचा शोध सुरु आहे. आगीत भंगाराच्या वस्तूंचे भरपूर नुकसान झाले. आगीनंतर परिसरात धुरांचे लोट पसरत होते. घटनास्थळी लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहे. पलामू पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now