Maha Kumbh Mela 2025: कुंभ मेळ्याचा सुंदर नजरा आणि प्लेन मध्ये होत असलेली Announcement, येथे पाहा व्हिडीओ

डीडी न्यूज ने एक सुंदर व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओमध्ये प्रयागराजच्या वरतून प्लेन जात असून त्यात सुंदर Announcement केली जात आहे. प्लेनमध्ये केली जात असलेली Announcement आणि कुंभ मेळ्याचा सुंदर नजरा फार हटके दिसत आहे.

Maha Kumbh Mela 2025 (फोटो सौजन्य - X/@LokmatTimes_ngp)

 Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळा १२ कुंभमेळ्यांनंतर येत असल्याने अलीकडे चर्चेचा विषय बनला आहे. यावर्षी अलाहाबादच्या प्रयागराज मध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा सुरु आहे. हा उत्सव एक जीवंत सांस्कृतिक उत्सव आहे ज्याचा उगम हजारो वर्षांपूर्वीचा आहे.  कुंभ हा शब्द कुंभ या संस्कृत शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ "घडा" असा होतो. गुरूच्या स्थितीशी संबंधित कुंभ राशीचे हे संस्कृत नाव देखील आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर महाकुंभमेळा भरतो. हा संगम त्रिवेणी संगम म्हणून ओळखला जातो. महाकुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा सार्वजनिक मेळावा आहे. या भव्य मेळाव्यामध्ये विविध पार्श्वभूमीचे तपस्वी, साधू, संत, कल्पवासी, साध्वी आणि भाविक एकत्र येतात. दरम्यान, डीडी न्यूज ने एक सुंदर व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओमध्ये प्रयागराजच्या वरतून प्लेन जात असून त्यात सुंदर Announcement केली जात आहे.  प्लेनमध्ये केली जात असलेली  Announcement आणि फार हटके दिसत आहे.

येथे पाहा व्हिडीओ:  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now