Madhya Pradesh Fire: मध्य प्रदेशातील ग्वालेर येथे प्लास्टिकच्या कारखान्याला आग, कोणतीही जीवितहानी नाही
मध्य प्रदेशातील ग्वालेर जिल्ह्यातील बारा गावात एका प्लास्टिकच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे.
Madhya Pradesh Fire: मध्य प्रदेशातील ग्वालेर जिल्ह्यातील बारा गावात एका प्लास्टिकच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुढील तपशिलाची प्रतिक्षा सुरु आहे. परिसरात धुरांचे लोट पसरत आहे. (हेही वाचा- देशात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कारला लागली आग; मुंबईमध्ये टाटा नेक्सॉनच्या गाडीने घेतला पेट)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)