Lok Sabha Elections 2024 Date: सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लोकसभा निवडणूकीची तारीख; निवडणूक आयोगाने पोस्ट शेअर करत सांगितलं सत्य

यादरम्यान, इंटरनेट आणि व्हॉट्सॲपवर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्याद्वारे असा दावा केला जात आहे की, हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान होतील असा दावा केला जात आहे.

Election Commission of India | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Lok Sabha Elections 2024 Date: देशात लोकसभा निवडणुका फार दूर नाहीत. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपापली रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. यादरम्यान, इंटरनेट आणि व्हॉट्सॲपवर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्याद्वारे असा दावा केला जात आहे की, हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान होतील असा दावा केला जात आहे. परंतु, हा संदेश बनावट आहे. निवडणूक आयोगानेच या संदेशाचे खंडन केले असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसल्याचे म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)