Leopard Spotted in Ludhiana: लुधियानातील निवाशी कॅप्लेक्समध्ये बिबट्याचा वावर, रहिवाशांना फुटला घाम; वन विभागाकडून शोध सुरु

पंजाबमधील लुधियाना येथील पक्खोवाल रोडवरील सेंट्रल ग्रीन सोसायटीमध्ये गुरुवारी रात्री एक बिबट्याचा वावर होताना दिसला.

Leopards | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Leopard Spotted in Ludhiana:  पंजाबमधील लुधियाना येथील पक्खोवाल रोडवरील सेंट्रल ग्रीन सोसायटीमध्ये गुरुवारी रात्री एक बिबट्याचा वावर होताना दिसला. रिपोर्टनुसार, एका इमारतीतील रहिवाशांना बिबट्या सोसायटीच्या पार्किंग परिसरात फिरताना दिसला. तर सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्येही बिबट्याचे दृश्य कैद झाले आहे. त्यानंतर रहिवाशांनी या घटनेबाबत जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची माहिती वन विभागाकडे दिली. वनविभागाकडून परिसरात बिबट्याचा शोध सुरु आहे. वन विभागाने आसपासच्या परिसरातील नागरिकांना सर्तक राहण्याचे सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)