Leopard Attack Caught on Camera in UP: बिबट्याच्या हल्ल्यात 6 गावकरी जखमी; उत्तरप्रदेशमधील धक्कादायक व्हिडीओ समोर (Watch Video)

उत्तर प्रदेशमधून बिबट्याच्या हल्ल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. कतरनियाघाट वन्यजीव विभागांतर्गत एका गावात बिबट्या घुसला आणि त्याने अनेक ग्रामस्थांवर हल्ला केला. ज्यात 6 जण जखमी झाले.

Photo Credit- X

Leopard Attack Caught on Camera in UP: कतरनियाघाट वन्यजीव विभागांतर्गत बहराइचमधील सुजौली करिकोट (Sujauli Karikot) भागातील एका गावात बिबट्याने अनेकांवर हल्ला करत गावकऱ्यांना जखमी केले आहे. वृत्तसंस्था आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, बिबट्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेवेळी बचावासाठी गावकऱ्यांनी मोठा आवाज करत बिबट्याला जंगलात हाकलून लावले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर स्थानिक अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले. (World's Most Expensive Cow: ब्राझीलमध्ये तब्बल 42 कोटीला विकली गेली Viatina-19 गाय; ठरली जगातील सर्वात महागडी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये)

बिबट्याच्या हल्ल्यात 6 गावकरी जखमी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now