Kolkatta Murder News: लिव्ह - इन पार्टनरची हत्या,महिला आरोपीला अटक, कोलकत्ता हादरलं

महिलेने लिव्ह -इन पार्टनरची चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगाल मध्ये घडली आहे.

Kolkatta Crime PC TWITTER

Kolkatta Murder News: महिलेने लिव्ह -इन पार्टनरची चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगाल मध्ये घडली आहे. या भयंकर घटनेने कोलकत्ता शहरात हाहाकार माजला आहे. मंगळवारी २७ फेब्रुवारी हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. महिला नवऱ्यापासून वेगळी राहत होती आणि तीला सहा वर्षाचा एक मुलगा देखील आहे. मुलाला आईकडे पाठवल्यानंतर महिलेने पार्टनरची राहत्या घरात हत्या केली. माहितीनुसार, महिलेचे पार्टनर सोबत वारंवार भांडण होत असायचे. त्यामुळे हत्या केली असावी असा संशय घेतला जात आहे. या हत्ये प्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केले आहे. या घटनेनंतर मुलाला आश्चर्याचा धक्काच बसला आहे. सार्थक दास असं मृताचे नाव आहे. ते दोघे जण सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now