Delhi Shocker : दिल्लीच्या मुखर्जी नगर भागात भरदिवसा तरुणीवर चाकू हल्ला, आरोपी अटकेत (Watch Video)

दिल्लीच्या मुखर्जी नगर भागात एका तरुणीवर भरदिवसा चाकूने हल्ला करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक कली आहे. तरुणीची प्रकृती ठीक आहे.

Photo Credit - Twitter

Delhi Shocker : दिल्लीत (Delhi ) महिलांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. मुखर्जी नगर (Mukherjee Nagar)भागातून अशीच एक घटना समोर आली आहे. भरदिवसा तरुणीवर एकाने चाकूने हल्ला(Knife Attack ) केला. याप्रकरणी २२ वर्षीय अमन नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. 22 मार्च रोजी ही घटना घडली होती. आरोपीने तरुणीवर हल्ला केल्यानंतर काहींनी मध्यस्थी करत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने तेथून पळ काढला. सुदैवाने या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली नाही. आरोपीला पोलिसांनी अटक( Accused Arrested) कली आहे.(हेही वाचा :Uttar Pradesh Crime: हुंड्याच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, संतापलेल्या माहेरच्यांनी पेटवले सासरचे घर; होरपळून दोघांचा मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now