Allahabad High Court Suspends Court Jamadar: वकिलांकडून टिप्स मिळवण्यासाठी Paytm QR Code वापरल्याबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयाने जमादाराला केलं निलंबित

कोर्ट जमादार राजेंद्र कुमार यांना अलाहाबाद हायकोर्ट कॅम्पसच्या महासंचालकांनी त्यांच्या गणवेशावर पेटीएम वॉलेट लावून वकिलांकडून लाच घेतल्याबद्दल निलंबित केले आहे.

Allahabad High Court Suspends Court Jamadar: पेटीएमचे क्यूआर कोड स्कॅनर कंबरेला लावून वकिलांकडून ऑनलाइन टिप्स घेणार्‍या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या जमादाराला सरन्यायाधीश न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले आहे. जमादाराचे हे कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सरन्यायाधीशांनी त्याची गंभीर दखल घेत रजिस्ट्रारला कारवाई करण्याचे निर्देश दिले.

कोर्ट जमादार राजेंद्र कुमार यांना अलाहाबाद हायकोर्ट कॅम्पसच्या महासंचालकांनी त्यांच्या गणवेशावर पेटीएम वॉलेट लावून वकिलांकडून लाच घेतल्याबद्दल निलंबित केले आहे. सरन्यायाधीशांनी व्हायरल झालेल्या फोटोची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले. त्यावर हायकोर्टाचे महासंचालक आशिष गर्ग यांनी निलंबनाचा आदेश दिला आहे. निलंबन कालावधीत राजेंद्र कुमार नजरत विभागाशी संलग्न राहतील. (वाचा - UP Shocker: उत्तर प्रदेशमध्ये चोरट्यांची दहशत कायम; कानपूरमध्ये चोरट्यांनी भरदिवसा महिलेला रस्त्यात अडवून चोरली सोनसाखळी, Watch Vide)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement