IPL Auction 2025 Live

Kolkata New Police Commissioner: IPS मनोज कुमार वर्मा बनले कोलकाताचे नवे पोलिस आयुक्त

त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही मागणी मान्य केली. पश्चिम बंगाल सरकारने मंगळवारी जारी केलेल्या माहितीनुसार, राज्यात अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

IPS Manoj Kumar Verma (फोटो सौजन्य -X/@tirthajourno)

Kolkata New Police Commissioner: भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी मनोज कुमार वर्मा (IPS Manoj Kumar Verma) हे कोलकाताचे नवे पोलीस आयुक्त (Kolkata New Police Commissioner) असणार आहेत. आंदोलक डॉक्टरांनी पोलीस आयुक्त विनीत गोयल यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही मागणी मान्य केली. पश्चिम बंगाल सरकारने मंगळवारी जारी केलेल्या माहितीनुसार, राज्यात अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोलकाता पोलीस आयुक्त विनीत कुमार गोयल यांना कोलकाता येथून एसटीएफचे एडीजी आणि आयजी बनवण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी मनोज कुमार वर्मा यांची कोलकात्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एवढेच नाही तर बंगाल सरकारने डॉ.कौस्तव नायक यांची इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअरचे नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IPS मनोज कुमार वर्मा यांची कोलकाताचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)