Job in Income Tax Department: आयकर विभागात नोकरीसाठी बनावट नियुक्ती पत्रे जारी; डिपार्टमेंटने जनतेला केले सावध
गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागामध्ये नोकरीसाठी बनावट नियुक्ती पत्र जारी केले जात आहे
गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागामध्ये नोकरीसाठी बनावट नियुक्ती पत्र जारी केले जात आहे. ही गोष्ट आयकर विभागाच्या नजरेस आली असून त्यांनी याबाबत जनतेला सावध केले आहे. नोकरी-इच्छुकांची अशा दिशाभूल करणाऱ्या फसव्या व्यक्तींना बळी पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. विभागाने सांगितले आहे की, आयकर विभागातील सर्व गट बी / ग्रुप सी ची प्रत्यक्ष भरती कर्मचारी निवड आयोगाद्वारे केली जाते आणि याबाबतची अधिसूचना एसएससीच्या अधिकृत वेबसाइट्सवर प्रकाशित केली जाते. त्यामुळे जनतेने इतर ठिकाणी प्रकाशित होणाऱ्या अशा बनावट जाहिराती/अधिसूचना/नियुक्ती पत्रे यांच्यावर विश्वास ठेऊ नये.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)