Indore: इंदूरमध्ये ऑपरेशननंतर आठ रुग्णांनी गमावली दृष्टी, तपासाचे आदेश
आधुनिक वैद्यकीय उपचार असलेल्या इंदूर शहरात नेत्र शिबिरात शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांपैकी आठ रुग्णांची दृष्टी गेली असल्याची घटना समोर आली आहे. यानंतर चोइथराम रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर सील करण्यात आले असून, जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती
Indore: आधुनिक वैद्यकीय उपचार असलेल्या इंदूर शहरात नेत्र शिबिरात शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांपैकी आठ रुग्णांची दृष्टी गेली असल्याची घटना समोर आली आहे. यानंतर चोइथराम रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर सील करण्यात आले असून, जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. नुकतेच चोइथराम नेत्रालय येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात ७९ रुग्णांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. यापैकी आठ रुग्णांनी दृष्टी कमी झाल्याची तक्रार केली. यानंतर ऑपरेशन थिएटर सील करण्यात आले होते.
एकीकडे ऑपरेशन थिएटर सील करण्यात आले आहे, तर दुसरीकडे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून तीन सदस्यीय तपास समितीही स्थापन केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)